संगीत साधना सोपी नाही. अत्यंत परिश्रमातूनच ही कला साध्य होते. अंगभूत प्रतिभा आणि त्या जोडीला परिश्रम असतील, तरच या क्षेत्रात अलौकिक प्राप्त होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबूजी. अर्थात सुधीर फडके. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संगीत साधना केली आणि स्वत:चे पर्व निर्माण केले. त्यांच्या सांगितिक वाटचालीविषयी एक आठवण...
संगीत साधनेसाठी...
अंगभूत प्रतिभेच्या जोरावर संगीत क्षेत्रात स्वत:चे युग निर्माण करणारे संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत

साधनेसाठी केलेली वाटचाल अत्यंत खडतर होती. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक बापू वाटवे यांनी त्याची एक आठवण सांगितलेली आहे. कोल्हापूरमधील पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बाबुजी संगीत साधनेसाठी मुंबईत आले. एका चाळीत त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली. भल्या पहाटे आन्हीक उरकून सार्वजनिक नळावर आंघोळ करायची आणि भायखळ्याच्या भाजी बाजारात हजर व्हायचे. फळे, भाज्या खरेदी करायच्या कधी भाड्याची सायकल घेऊन तर कधी पायी गिरगाव ते दादर दारोदार फिरुन भाजी विकायची. काहीवेळा जोडीला चहा पावडर असे. त्यातून मिळणाऱ्या पैशात बाबुजी गरजा भागवायचे. हा उद्योग आटोपला की संगीताच्या शिकवण्या करायच्या, मेळ्यातील गाण्यांना चाल लावून द्यायची. "हिज मास्टर्स व्हाइस' कंपनीत संगीतकारापासून म्युझिक हॉल साफ करण्यापर्यंत पडेल ते काम करायचे. असे अनेक कष्ट बाबुजींनी केले. दिवसभर गाऊन एक आणेली मिळाली तरी त्यावर त्यांनी समाधान मानले. मध्य प्रदेशातील एक गोंड राजाने बाबुजींच्या गाण्यावर प्रसन्न होऊन त्यांना त्याकाळी शंभर रुपयांची बिदागी दिली होती. पण एकदा पैशांची खूप निकड भासली म्हणून त्यांना पेटी आणि तंबोराही विकावा लागला होता.
2 comments:
Is your blog dedicated to music (classical music in particular)? I think there are very few blogs highlighting this field of classical music (discussion, criticism). Good work!
बाबुजींचे आयुष्य खडतर होते याची कल्पना होती,पण इतकी खोलात माहिती नव्हती.
संगीत समिक्षेचा तुमचा हा नविन ब्लॉग छान आहे.
Post a Comment